पाणी फाऊंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत ‘सोयाविन शेतकरी स्पर्धा’वीजेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

0 झुंजार झेप न्युज

पाणी फाऊंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत ‘सोयाविन शेतकरी स्पर्धा’वीजेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

अकोला,दि. 27 : जिल्ह्यात पाणी फाऊंडेशन समृद्ध गाव स्पर्धा अंतर्गत ‘सोयाविन शेतकरी स्पर्धे’ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे विजेते ठरलेल्या शेतकऱ्यांना दोन सायकल कोळपे संयत्र, चिकट सापळे व प्रमाणपत्रांचे वितरण जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.  

यावेळी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाडवे, पाणी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक सुभाष नानवटे, बार्शीटाकळी तालुका समन्वयक संघपाल वाहुरवाघ, विद्या वाकोडे यांची उपस्थिती होती. 

पाणी फाऊंडेशन समृद्ध गाव स्पर्धा अंतर्गत शेतकऱ्यांचे सोयाबीन उत्पादन वाढविण्याकरीता ‘सोयाविन शेतकरी स्पर्धे’ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वाधिक प्रश्नांची बरोबर उत्तर देणाऱ्या शेतकऱ्यांची विजेते म्हणून निवड करण्यात आली. त्यात प्रथम पारितोषिक विजेते बाळापूरचे प्रतिक रमेश बाहोकार व भगवंत रातोंडे यांना सायकल कोळपे संयत्र तर व्दितीय पारितोषिक विजेते बार्शीटाकळी येथील चेतन गावंडे व अकोलाचे ऋषिकेश महल्ले यांना चिकट सापळे पारितोषिक व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.