पर्यावरणपूरक गणेश विसर्जन कुंड गणेशभक्तांसाठी खुला अमर मित्र मंडळ, उदय गायकवाड युवा मंचचा उपक्रम

0 झुंजार झेप न्युज

• पिंपरी- चिंचवडमधील पर्यावरण प्रेमी सायकलपटुंचा सन्मान

पिंपरी चिंचवड,दि.17 : नदी व घाटावर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी तसेच पर्यावरण पूरक गणेश विसर्जनासाठी 'अमर मित्र मंडळ' आणि 'उदय गायकवाड युवा मंच'च्या वतीने दिघी येथे गणेश विसर्जन कुंड नागरिकांसाठी खुला करण्यात आला. यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या सायकलपटुंचाही सन्मान करण्यात आला.

दिघीतील राघव मंगल कार्यालय परिसरात हा विसर्जनकुंड उभारण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.१७) कुंडाचे पूजन करण्यात आले. यावेळी हभप दत्तात्रय आबा गायकवाड, पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, उपमहापौर हिरा नानी घुले, नगरसेविका निर्मला मनोज गायकवाड आदी उपस्थित होते.

अमर मित्र मंडळ आणि उदय गायकवाड युवा मंचाच्या वतीने नेहमीच सामाजिक आणि लोकाभिमूख उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. कोरोना काळातही मंडळाच्या वतीने नागरिकांसाठी भरीव उपक्रम राबविण्यात आले. गणेशोत्सवात अनावश्यक खर्च टाळून मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात आला. दरम्यान, गणेश विसर्जनादरम्यान घाट आणि नदीपात्र परिसरात होणारे प्रदूषण शहराला नवे नाही.

या पार्श्वभूमीवर अमर मित्र मंडळ आणि उदय गायकवाड युवा मंचच्या वतीने पर्यावरण पूरक गणेश विसर्जनासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार दिघी परिसरात गणेश विसर्जन कुंड उभारण्यात आला आहे. या कुंडामध्ये पर्यावरण पूरक आणि तितक्याच धार्मिक पद्धतीने गणेश विसर्जन करण्यात येणार आहेत. यासाठी मंडळाचे स्वयंसेवक उपथित असणार आहेत. तसेच निर्माल्य दानाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. याचवेळी पर्यावरण संवर्धन सायकल पटू गौरव सन्मान सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायकलिंगद्वारे पर्यावरण वाचवाचा संदेश देणाऱ्या सायकलपटुंना गौरवण्यात आले. विसर्जनादरम्यान नागरिक आणि भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करावे,एकमेकांमध्ये योग्य अंतर ठेवावे आणि पर्यावरणपूरक कुंडातच गणेश विसर्जन करावे असे आवाहन उदय गायकवाड यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.