मोटर सायकली चोरी करणारी अंतरजिल्हा टोळी जेरबंद , १७ मोटार सायकली हस्तगत

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड,गुन्हे शाखा युनिट १ ची धडाकेबाज कारवाई

पिंपरी चिंचवड : शहरामध्ये वाढत्या दुचाकी चोरीस आळा घालण्याचे दृष्टिने पोलीस आयुक्त श्री . अंकुश शिंदे सो . यांनी दिलेल्या सुचनेस अनुसरून गुन्हे शाखा युनिट १ कडील पोलीस पथकाने आरोपींचा माग काढुन चाकण चौक येथे सापळा लावुन थांबले असता एका मोटार सायकली वरून तीन इसम संशयीत रित्या खेड कडुन येत असताना दिसुन आले . पोलीसांना पाहून ते पळुन जात असताना पो ना , १४१७ सचिन मोरे व पो.शि. १७ ९ १ प्रमोद गर्जे यांनी त्याचा एक कि.मि. पाठलाग करुन शिताफ़िने पकडले . त्यांना नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे *१ ) प्रज्वल प्रताप देशमुख , वय २० वर्षे , रा . वरवटे मळा , जवळेकडलग , ता . संगमनेर , जि . अहमदनगर , २ ) अक्षय लहानु जाधव , वय २७ वर्षे , रा.न्यु तांबे हॉस्पीटल समोर , बटवाल मळा , संगमनेर ता . संगमनेर , जि . अहमदनगर* असे सांगितली त्याचेकडे चौकशी केली ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यांना युनिट १ कार्यालयात आणुन सखोल चौकशी केली असता त्याचे ताब्यात असलेली मोटार सायकल ही त्यांनी म्हाळुंगे , चाकण परीसरातुन चोरी केल्याचे उघड झाल्याने त्यांना *चाकण पोलीस स्टेशन कडील गु.रजि . नं . ७६८/२०२२ भादवि कलम ३७९* या वाहन चोरीचे गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली . आरोपी यांची पोलीस कस्टडी घेवुन तपास करता त्यांनी त्यांचा संगमनेर येथील साथीदार तुषार फटांगरे , रा . संगमनेर , जि . अहमदनगर व एक अल्पवयीन साथीदारासह पिंपरी चिंचवड , पुणे ग्रामीण , नाशिक या परीरातुन मोटार सायकली चोरी करून त्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर , पाथर्डी , अकोले येथे त्यांचे ओळखिचे लोंकाना विक्री केल्याचे सखोल तपासामध्ये उघड झाले . त्यानुसार त्यांचा साथीदार *तुषार भारत फटांगरे , वय २१ वर्षे , रा.मु.पो.पोखरी बाळेश्वर , ता . संगमनेर , जि . अहमदनगर* यास संगमनेर परीसरातुन ताब्यात घेवुन त्यासही दाखल गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे . 

पोलीस कोठडी दरम्यान आरोपी हे संगमनेर येथे मोटार सायकली वरून पुणे नाशिक रोडवरील चाकण , राजगुरुनगर , नारायणगाव , आळेफ़ाटा व नाशिक परीसरात येवुन मोटार सायकल चोरी करून रातोरात परत जात असे व चोरीलेल्या मोटार सायकली हयापरीचीत लोकांना कागदपत्र नंतर देतो असे अश्वासन देवुन विकत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे . आरोपीकडुन त्यांनी त्यांचे ओळखिच्या लोकांना विकलेल्या *एकुण ९ लाख ४५ हजार रूपयांच्या १७ मोटार सायकली* हस्तगतकरण्यात आल्या असुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत . 

१. चाकण पो.स्टे.गु.रजि . नं . ३४४/२०२२ भादवि कलम ३७९ 

२. चाकण पो.स्टे .गु .रजि . नं .

७७९/ २०२२ भादवि कलम ३७९ 

३. चाकण पो.स्टे.गु.रजि . नं . ३४४/२०२२ भादवि कलम ३७९ 

४. चाकण पो.स्टे.गु. रजि . नं . ७७२/२०२२ भादवि कलम ३७९ 

५. चाकण पो.स्टे.गु.रजि . नं . 

९६२/२०२२ भादवि कलम ३७९ 

६. चाकण पो.स्टे . गु . रजि . नं . 

९०९/२०२२ भादवि कलम ३७९ 

७. चाकण पो.स्टे.गु.रजि . नं . 

७६८/२०२२ भादवि कलम ३७९ 

८. नारायणगाव पो.स्टे . पुणे ग्रामीण गु.रजि . नं .६१/२०२२ भादवि कलम ३७ ९

९ . नारायणगाव पो.स्टे . पुणे ग्रामीण गु.रजि.नं. १४०/२०२२ भादवि कलम ३७९

१०. खेड पो.स्टे . पुणे ग्रामीण गु.रजि . नं . ३९०/२०२२ भादवि कलम ३७९

११.आळेफाटा पो.स्टे . पुणे ग्रामीण गु.रजि.नं. १५१/२०२२ भादवि कलम ३७९ 

१२. लोणी पो.स्टे . जि .अहमदनगर गु.रजि . नं.९८/२०२२ भादवि कलम ३७९ 

१३. भद्रकाली पो.स्टे . नाशिक शहर गु.रजि . नं .१२७/२०२२ भादवि कलम ३७९ 

१४. नाशिक रोड पो.स्टे . नाशिक शहर गु . रजि . नं . ११३/२०२२ भादवि कलम ३७९ 

१५. नाशिक रोड पो.स्टे . नाशिक शहर गु . रजि . नं . ११२/२०२२ भादवि कलम ३७९ 

१६. नाशिक रोड पो.स्टे . नाशिक शहर गुरजि . नं . ८९ / २०२२ भादवि ३७९

१७. मुंबई नाका पो.स्टे . नाशिक शहर गु . रजि . नं . १०१ / २०२२ भादवि कलम ३७९ 

अटक आरोपी अक्षय लहानु जाधव हा संगमनेर ग्रामीण पोलीसांचे रेकॉर्ड वरील असुन त्याचे विरूध्द वाहन चोरी व इतर चोरीचे गुन्हे दाखल आहेत .

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे , अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय शिंदे , पोलीस उप आयुक्त डॉ काकासाहेब डोळे , सहायक पोलीस आयुक्त डॉ प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर तसेच पोलीस अंमलदार प्रमोद गर्जे , सचिन मोरे , फारूक मुल्ला , अमित खानविलकर , गणेश महाडीक , सोमनाथ बोन्हऱ्हाडे , महादेव जावळे , जावेद पठाण , विशाल भोईर , बाळु कोकाटे , मनोजकुमार कमले , उमाकांत सरवदे , मारुती जायभाये , अजित रूपनवर , प्रमोद हिरळकार , स्वप्निल महाले यांचे पथकाने केली आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.