पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास कामास अधिक गती द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

0 झुंजार झेप न्युज

पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास कामास अधिक गती द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई,दि.17: देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती द्यावी आणि त्याचा कालबध्द आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज १७ जून रोजी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले. आज श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील महंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामध्ये महंत बाबूसिंग महाराज, कबीरदास महाराज, जितेंद्र महाराज, सुनिल महाराज, धन्नु महाराज (कर्नाटक), जगनू महाराज (कर्नाटक), रामसिंग महाराज, यशवंत महाराज, सुंदर महाराज त्याचप्रमाणे मेहताबसिंग नाईक, ॲड. अभय राठोड, पोपटलाल चव्हाण, गोपाल राठोड व बंजारा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, पोहरादेवी तीर्थक्षेत्राची कामे रखडता कामा नये. वेळच्या वेळी त्यासाठी निधी दिला जात असला तरी कालबध्द रीतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींची उपस्थिती होती.

*******

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.