'आप'ने महापालिकेला दिली फांदी

0 झुंजार झेप न्युज

भेट शहरभर पडलेल्या फांद्या उठावासाठी अनोखे आंदोलन

कोल्हापूर : दोन आठवड्यापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे शहरभर झाडांच्या फांद्या पडल्या. या फांद्या उचलण्यासाठी महापालिकेने गार्डन विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करून झाडे पडली असतील तर नागरिकांनी कळवावीत असे आवाहन केले. परंतु अद्याप फांद्या उठावाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने शहरभर अक्षरशः ढीग पडले आहेत. ठीक ठिकाणी पडलेल्या फांद्यांचे फोटो संबंधीत नंबरवर पाठवून देखील त्यावर कार्यवाही होत नसल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेवर फांद्यांनी भरलेला गाडा नेऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी वाळलेल्या नारळाच्या फांद्या दर्शवून महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध केला.

महापालिकेच्या वतीने जाहीर केलेल्या क्रमांकावर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी पाठवल्या, परंतु त्यावर अद्याप कार्यवाही केली गेली नाही. शहरातील फांद्या उठाव केल्याचा महापालिकेचा दावा फोल असल्याचे 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले. महापालिकेचे दावे म्हणजे बोलाचा भात आणि बोलची कढी असल्याचा आरोप देसाई यांनी केला.यावेळी उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, विजय हेगडे, राज कोरगावकर, विशाल वठारे, मयूर भोसले, प्रथमेश सूर्यवंशी, अभिजित कांबळे, रवींद्र राऊत, डॉ. कुमाजी पाटील, दत्तात्रय बोंगाळे, बसवराज हदीमनी, मंगेश मोहिते, राजेश खांडके, संजय नलावडे, प्रकाश हरणे, संजय सूर्यवंशी, सचिन वणीरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.