निंबवडे वितरिकेच्या बंदिस्त पाईपलाईन कामाची पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली पाहणी

0 झुंजार झेप न्युज

निंबवडे वितरिकेच्या बंदिस्त पाईपलाईन कामाची पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली पाहणी

 

सांगली,दि.12: आटपाडी तालुक्यातील टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत आटपाडी डाव्या कालव्यावरील कि. मी. ७ मधील निंबवडे वितरिकेच्या कामाची क्षेत्रीय पाहणी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली. यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले, अधिक्षक अभियंता मिलींद नाईक व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

निंबवडे वितरिकेचे एकूण लाभक्षेत्र 1 हजार 300 हेक्टर इतके असून मुख्य वितरिकेची लांबी 27.200 कि. मी. इतकी आहे. बंदिस्त नलिका प्रणालीच्या 18 कि.मी. व 19 कि.मी. मधील विमोचकांची पाहणी करून तेथील वितरिकेच्या कामाचे तसेच पाण्याचा दाब पाहून पालकमंत्री जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.