लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई,सहाय्यक पोलीस निरीक्षकास एक लाखाची लाच घेताना पकडले रंगेहाथ.

0 झुंजार झेप न्युज

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई,सहाय्यक पोलीस निरीक्षकास एक लाखाची लाच घेताना पकडले रंगेहाथ.

गोंदिया : दररोज वर्तमानपत्र उघडले की लाच स्वीकारताना अनेक महाभाग पकडले गेलेले आपणास रोजचं वाचायला भेटते परंतु तरीही लाच स्वीकारनाऱ्यास काहीच फरक पडत नसल्याचे स्पष्ट दिसुन येतं आहे.आजही अशीच घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरिक्षक व एका व्यक्तीस एक लाख रूपयांची लाच स्वीकारताना गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्या ची घडली असुन. या दाेन्ही संशयित आराेपींना अटक करण्यात आली आहे. श्रीकांत पवार (वय ३७) असे सहाय्यक पोलिस निरिक्षकाचे नाव आहे तर अनिल सोनकनवरे (वय ३७) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हे आमगाव येथील शेतकरी आहेत. ते यापुर्वी जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते. दरम्यान तुम्ही सरकारी जमीन विकल्याचा अर्ज प्राप्त झाला असून तुमच्या विरोधात आमगाव पोलिसात गुन्हा दाखल होणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार यांनी फोन वरुन तक्रारदारास सांगितले. हा गुन्हा दाखल केला जाऊ नये यासाठी पाच लाख रुपये लाचेची मागणी एका व्यक्तीच्या माध्यमातून पवार यांनी केली. दरम्यान तडजोडी अंती दाेन लाख रुपये देण्याचे ठरले.

त्यानंतर तक्रारदार याने गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपक साधत याबाबत तक्रार केली. एसीबीने शहिनशा करुन सापळा रचत सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीकांत पवार व अनील सोनकनवरे याला लाचेचा पहिला हप्ता एक लाख रुपये स्वीकारताना पकडले. दाेघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या धडक कारवाईची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.