भाजपच्या अनुसूचित जातीतील नगरसेवकांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जातीच्या कल्याण समितीचे अध्यक्षा प्रणिती ताई शिंदे यांच्याकडे मागणी

0 झुंजार झेप न्युज

भाजपच्या अनुसूचित जातीतील नगरसेवकांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जातीच्या कल्याण समितीचे अध्यक्षा प्रणिती ताई शिंदे यांच्याकडे मागणी 

पिंपरी चिंचवड : उद्योगनगरीतील अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी शहरातील भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या माजी नगरसेवकांनी महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षा आमदार प्रणितीताई शिंदे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, विनायक गायकवाड, सागर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, बाळासाहेब ओव्हाळ, सौ. मनीषा प्रमोद पवार, सौ. ममता विनायक गायकवाड, श्रीमती शोभा आदियाल या लोकप्रतिनिधीं सदर निवेदन दिले.सदर मागण्यांचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन अध्यक्षा प्रणितीताई शिंदे यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.