पंचशील बहुउद्देशीय सामाजिक संस्था व हिलींग हाइन्ड्स सोशल फाउंडेशन यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन - सुरज चंद्रकांत गायकवाड

0 झुंजार झेप न्युज

पंचशील बहुउद्देशीय सामाजिक संस्था व हिलींग हाइन्ड्स सोशल फाउंडेशन यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन - सुरज चंद्रकांत गायकवाड

पिंपरी चिंचवड : आज पंचशील बहुउद्देशीय सामाजिक संस्था व हिलींग हाइन्ड्स सोशल फाउंडेशन यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन श्री. सुरज चंद्रकांत गायकवाड (अध्यक्ष, पंचशील बहुउद्देशीय सामाजिक संस्था) व सौ. शिल्पाताई सुरज गायकवाड (सेक्रेटरी, पंचशील बहुउद्देशीय सामाजिक संस्था) यांनी केले होते. सदरील शिबिर आयोजित करण्यासाठी हिलींग हाइन्ड्स फौंडेशनच्या शिबीर व्यवस्थापक सौ. अनिता सईद मॅडम, डॉ. श्रुती देशमुख, डॉ. तेजश्री खलाटे मॅडम, श्री.आनंद मिसाळ, किरण खराडे यांनी सहकार्य केले.या शिबिरामध्ये पोटाशी संबंधित आजार, मूळव्याध, बद्धकोष्ठता, फिशर, फिस्चुला, हार्निया, आदी आजारावर मोफत मार्गदर्शन तपासणी व उपचार शिबिराचा निगडी परिसरातील स्वव्वाशे पेक्षा जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला..

सदरील शिबिराला सामाजिक कार्यकर्ते ऍड. रवींद्र आरु निगडीमधील माजी नगरसेवक श्री. सचिनभाऊ चिखले, उद्योजक श्री.बापूसाहेब घोलप, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँगेसचे वरीष्ठ उपाध्यक्ष श्री. दिलीपशेठ पांढारकर, काँगेस युवा नेते हर्षवर्धन पांढारकर, भाजपा अनुसूचित जाती युवा मोर्चाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन उदागे, राजरत्न बुद्ध विहाराचे संस्थापक श्री. सन्मुख हादीमनी, श्री. शरणाप्पा हिप्परगेकर, राजरत्न बुद्ध विहाराचे अध्यक्ष श्री. विनायक निंबाळकर, श्री. रमेश गायकवाड, श्री. चंद्रकांत गायकवाड, काँगेस जेष्ठ नेते प्रकाश मकासरे, किशोर लांडगे, आकाश बोगडे, उमेश कांबळे, अविनाश शिंदे, सुनील वायदंडे, गौतम गायकवाड, परमेश्वर निसरगन्ध आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.