ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे - दत्तात्रय प्रभुणे, पर्सिस्टंट फाऊंडेशन.

0 झुंजार झेप न्युज

यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स व पर्सिस्टंट फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गाचा प्रशस्तीपत्र वितरण सोहळा संपन्न

पिंपरी चिंचवड : युवकांनी करिअरच्या प्राथमिक टप्प्यात असतानाच स्वतःचे कौशल्य अद्ययावत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होणे गरजेचे आहे, असे मत पर्सिस्टंट सिस्टम्स चे वरिष्ठ पदाधिकारी दत्तात्रय प्रभुणे यांनी व्यक्त केले. यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स व पर्सिस्टंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या डेटा एन्ट्री ऑपरेटर या कोर्सच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या प्रशस्तीपत्र वितरण सोहळ्यात चिंचवड येथे ते बोलत होते. केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी 'यशस्वी' संस्थेच्यावतीने उत्तमरीत्या होत असल्याने ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम करण्यात मोठे योगदान दिले जात आहे, असेही प्रभूणे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागातील युवक अजूनही शहरांमधील रोजगारसंधींना सामोरे जाताना त्यांच्यात न्यूनगंड असल्याचे जाणवते . ग्रामीण भागातील विद्यार्थी अजूनही शहरी वातावरणात बुजतात, अशावेळी ते जिथे राहतात त्याच ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदावर ऑन द जॉब ट्रेनिंग द्वारे रोजगारक्षम होण्याची संधी अप्रेन्टिस योजनेच्या माध्यमातून 'यशस्वी' संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे . याप्रसंगी दत्तात्रय प्रभुणे व पर्सिस्टन्ट फाउंडेशनचे सहाय्यक व्यवस्थापक वैभव निकम, यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स(आयआयएमएस)चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत कौशल्य प्रशिक्षण मूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रशिक्षक अभिमन्यू पिसे यांनाही विशेष प्रशस्तीपत्र देऊन यावेळी गौरविण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पूनम गुरव व संतोष गुळूमकर या दोन प्रशिक्षणार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सचे संचालक राजेश नागरे यांनी तर आभार प्रदर्शन स्मिता मेटे यांनी केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.