झांशीची राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन

0 झुंजार झेप न्युज

झांशीची राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन 

पुणे : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालगंधर्व चौकात राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ अहिल्यादेवी शाळा आणि मा. स. गोळवलकर गुरुजी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.ढोल-ताशाच्या गजरात गोळवलकर गुरजी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. मेरी झांसी नहीं दूंगी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसीवाली रानी थी, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

स्वरा अपामार्जने या विद्यार्थिनींने पोवाड्याचे गायन केले. हिरण्याक्षी पवार हिने लक्ष्मीबाईंची चरित्रकथा, पराक्रम कथन केला. गाथा राऊत या विद्यार्थिनीने झाशीच्या राणीची वेशभूषा केली होती.अहिल्यादेवीच्या पर्यवेक्षिका चारुता प्रभुदेसाई, शिक्षिका दीपाली थोरात, डॉ. सुलोचना शिंदे-माने, सुभाष निंबाळकर, प्रशांत जाधव यांनी संयोजन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.