काँग्रेस पक्षाची वाढती लोकप्रियता हे शहराध्यक्ष कैलास कदम यांचे यश - भीमरत्न प्रा. बी.बी.शिंदे.

0 झुंजार झेप न्युज

काँग्रेस पक्षाची वाढती लोकप्रियता हे शहराध्यक्ष कैलास कदम यांचे यश - भीमरत्न प्रा. बी.बी.शिंदे. 

पिंपरी चिंचवड: शहरातील सामाजिक व पुरोगामी चळवळी चे नेते, राज्यभर असलेल्या सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज, या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, भिमरत्न प्रा. बी.बी. शिंदे यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.कैलासभाऊ कदम यांच्या उपस्थतीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी त्यांच्या समवेत प्रामुख्याने हरिश्चंद्र शिंदे,लक्ष्मण शिरसाठ, विठ्ठल लांडगे, सीताराम बनसोडे व प्रकाश वाव्हळे आदींचा समावेश होता.काँग्रेस पक्षाचे उपरणे व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.  

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले,"शहरात काँग्रेस पक्षाला बहुजनवादी चळवळी तील नेत्यांची वाढती पसंती व काँग्रेस पक्षाची वाढती लोकप्रियता हे शहराध्यक्ष कैलास कदम यांचे यश आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चित पणे आगामी मनपा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश प्राप्त होईल सामान्य नागरिक, गरीब, कष्टकरी, झोपडपट्टी धारक, बहुजन समाज व चळवळीतील कार्यकर्ते यांचा पूर्ण पाठिंबा काँग्रेसला प्राप्त होत आहे"

काँग्रेस पक्ष मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे झालेल्या या प्रवेश कार्यक्रमास शहर काँग्रेस चे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पुणे जिल्हा एस.सी. विभागाचे अध्यक्ष राहुल ओव्हाळ, चिंचवड ब्लॉक काँग्रेस चे अध्यक्ष माऊली मलशेट्टी, पिंपरी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वनाथ जगताप, हरीश डोळस, हिरा जाधव, विजय ओव्हाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.