'आप' तर्फे वॉर्ड नं १९ येथील सुभाषनगर येथे ७३ महीलाना 'घेरेलु कामगार कार्ड ' वाटप

0 झुंजार झेप न्युज

'आप' तर्फे वॉर्ड नं १९ येथील सुभाषनगर येथे ७३ महीलाना 'घेरेलु कामगार कार्ड ' वाटप

कोल्हापूर,दि.12: आज वॉर्ड नं १९ येथील संत राहीदास कॉलनी हॉल मध्ये घरेलु काम करणाऱ्या ७३ महिलांना कामगार आयुक्त कार्यालयात घरेलू कामगार नोंदणी कार्ड वाटण्यात आले.यावेळी सुभाषनगर-जवाहरनगर-सिरत मोहल्ला - नेहरूनगर येथील सर्व गरीब गरजू सर्वसामान्य लोकांच्या सेवेत कधीच कमी पडणार नाही असा विश्वास संघटनमंत्री व इच्छुक उमेदवार मा.सुरज सुर्वे यांनी व्यक्त केला.तसेच कोल्हापूर शहरातील महिलांना स्वावलंबी व स्वयंरोजगार बनवण्यासाठी, तसेच महिलांसाठी असणाऱ्या शासनाच्या सर्व योजना ह्या शहरातील प्रत्येक महीले पर्यंत पोहचवण्यासाठी आम आदमी पार्टी महिला आघाडी नेहमीच प्रयत्नशील राहिल असे महीला शहराध्यक्ष सौ.अमरजा पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी जे काही करायला लगेल त्यात कुठेही आम आदमी पार्टी कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली व सर्व महिलांना आम आदमी पार्टी व सुरज सुर्वे यांच्या पाठीशी राहण्याचं आव्हान केलं.यावेळी प्रस्तावीक युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी यांनी केलं,सुत्र संचालन रिक्षा संघटना समन्वयक विशाल वठारे यांनी तर आभार प्रदर्शन शहर उपाध्यक्ष मा.संतोष घाटगे यांनी केले.

कार्यक्रमास युवा जिल्हा अध्यक्ष उत्तम पाटील, स्मिताचौगुले, पुनम ठाकरे, अभिजीत कांबळे, राजेश खांडके, प्रथमेश सुर्यवंशी, राज कोरगावकर, आनंदा चौगुले, बसवराज हद्दिमनी , रणजीत पाटील, लाला बिर्जे, संजय नलवडे, मंगेश मोहिते, प्रभाकर चौगुले, अभिजीत भोसले, प्रकाश जाधव तसेच भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.