दलित पँथर च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दिवंगत राजा ढाले यांच्या कुटुंबियांना केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान
मुंबई,दि.16 : दलित पँथर चे संस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे विचारवंत नेते दिवंगत राजा ढाले यांच्या तृतीय स्मृतीदिनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी विक्रोळी येथील ढाले यांच्या निवासस्थानी जाऊन दिवंगत राजा ढाले यांना विनम्र अभिवादन केले. तसेच दलित पँथर च्या सुवर्णमहोत्सवा निमित्त दलित पँथर चळवळीत भरीव योगदान दिलेल्या पँथर च्या कुटुंबीयांना सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्याचा संकल्प ना.रामदास आठवले यांनी केला असून ते सन्मानचिन्ह दिवंगत राजा ढाले यांच्या कुटुंबियांना आज ना.रामदास आठवले यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी दिवंगत राजा ढाले यांच्या पत्नी दीक्षा ढाले; मुलगी गाथा ढाले आणि नातू उन्नयन तसेच रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर ;गौतम सोनवणे; बाळासाहेब गरुड ; सुरेश भालेराव;वैशाली संगारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

