महिलेचा खून करून तिचे अंगावरील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व तिच्या घरात असणारे पत्र्याचे पेटीतील दागिने व रोख रक्कम चोरणारे आरोपीस प्रयागराज उत्तर प्रदेश येथे अटक करून त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला,भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
पुणे,दि.18 : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे येथे दिनांक 13/07/2022 रोजी गु.र.नं.462/2022 भा.द.वि 302.397,460 हा फिर्यादी-शहाजी मारुती चंदनशिवे यांना दिलेल्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आला आहे.दि.11/07/2022 सायंकाळी 7 : 00 वा.ते दि.12/07/2022 सायंकाळी 9:00 वा. चे दरम्यान यातील फिर्यादी याची बहीण नामे- श्रीमती पारूबाई किसन सावंत,वय 65 वर्ष रा. मेनका स्टोन कंपनी स.नं.13 भिलारेवाडी कात्रज पुणे हि तिचे राहते घरी एकटीच असताना आरोपीने तिचे घरात प्रवेश करून, तिचा गळा दाबून खून करून, तिचे गळ्यातील सोन्याचे दागिने, कानातील कर्णकुळे, तसेच पत्र्याचे पेटीतील रोख रक्कम व दागिने जबरीने चोरून घेऊन गेला म्हणून संशयित आरोपी सुखाबिंदा रा. मेनका स्टोन कंपनी जवळ भिलारेवाडी कात्रज पुणे याच्या विरुद्ध वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्यातील आरोपी सुखाबिंदा याचा शोध घेत असताना उत्तर प्रदेश राज्य येथे पळून गेल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने मा. वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता,पोलीस कर्मचारी धनाजी धोत्रे, राहुल तांबे व आशिष गायकवाड यांच्या टीमला आरोपीचा शोध घेणे करिता लागलीच उत्तर प्रदेश येथे रवाना केले.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता व त्यांचा स्टाफ हे आरोपीचा शोध घेत असताना सदरचा आरोपी बादल उर्फ सुग्गा बनवारी बिंद, वय 27 वर्ष रा. ग्राम दुबावले, थाना सराज इनायात, जिल्हा प्रयागरज, उत्तर प्रदेश राज्य हा दि.15/07/2022 रोजी सराई इनायात पोलीस ठाणा.जिल्हा प्रयागराज उत्तर प्रदेशचे हद्दीत मिळून आल्याने त्या सदर ठिकाणी अटक करून तेथील न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्याचे दिनांक 17/07/2022 रोजी पर्यंत ट्रांन्झीट रिमांड मंजूर केल्याने त्यास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे आणून दि.17/07/2022 रोजी दाखल गुन्ह्यात अटक करून मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो.कोर्ट नंबर 4 पुणे येथे हजर केले असता. मा. न्यायालयाने दि.21/07/2022 रोजी पर्यंत पोलीस कस्टडीची रिमांड मंजूर केली आहे.
सदर रिमांड मुदतीत आरोपीकडे तपास केला असता त्याच्याकडून मयत महिलेचा खून करून चोरून नेलेले रोख रुपये 02/00,500 / व सोन्याचे दागिने 6 तोळे,8 ग्रॅम,900 मि.ग्रॅम (एक मंगळसूत्र, एक नेकलेस, कर्णफुलाचा जोड, व दोन वेल, तीन पदरी मोहनमाळ, कुडकी बाली एक जोड, काली पोत त्यात चार मनी व पेंडल अंगठी व कानातील रिंग) असं मिळून एकूण 5,38,000/-रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव या करत आहेत.सदरची कामगिरी मा.राजेंद्र डहाळे सो. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सागर पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 02 पुणे शहर श्रीमती. सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.जगन्नाथ कळसकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, तपास पथकाचे अंमलदार आशिष गायकवाड,राहुल तांबे,धनाजी धोत्रे,यांनी केली आहे.

