'आप' रिक्षा संघटनेच्या रिक्षाचालकाने लावला फलक

0 झुंजार झेप न्युज

महानगरपालिकेच्या डांबराची कोल्हापुरात चर्चा

कोल्हापूर,दि.15 : पावसाळा आला की महानगरपालिकेने केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडतात. याच खड्ड्यांचा निषेध म्हणून आम आदमी रिक्षाचालक संघटने सभासद असणाऱ्या रिक्षाचालक हणमंत जाधव यांनी आपल्या रिक्षावर मार्मिक संदेश लिहत पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ मीठ की साखर असा प्रश्न विचारला आहे. त्याचं उत्तर लिहलंय महानगरपालिकेचा डांबर. अशापद्धतीने महानगरपालिकेच्या दर्जाहीन काम चव्हाट्यावर आणून रिक्षाचालक जाधव काकांनी महापालिकेच्या भोंगळ कारभार सगळ्यांसमोर आणला आहे.

संघटनेचे मार्गदर्शक संदीप देसाई यांनी जाधव यांची भेट घेऊन महापालिकेचा कारभार उघड करण्याचं धाडस केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.