राष्ट्रध्वज बाईक रॅली चे आयोजन करून स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत मोहत्सव साजरा.

0 झुंजार झेप न्युज

ऑल इंडिया मजलीस ए इतहाद्दूल मुस्लिमिन (एम आय एम )पक्ष पिंपरी चिंचवड शहर वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ व राष्ट्रध्वज बाईक रॅली चे आयोजन करून स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत मोहत्सव साजरा.

पिंपरी चिंचवड: आपल्या भारत देशाच्या ७५ व्या स्वतंत्र्याच्या अमृत मोहत्सव निमित्त ऑल इंडिया मजलीस ए इतहाद्दूल मुस्लिमिन (इम आय एम ) पक्ष पिंपरी चिंचवड शहर वतीने खराळवाडी येथील जनसंपर्क कार्यालय येथे राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष धम्मराज साळवे ,महिला शहराध्यक्ष रुहिनाज शेख ,युवा नेते खालिद मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले ,राष्ट्रगीत ,संविधान प्रास्ताविक वाचन करून शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी उपस्थितांना शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी जेष्ठ नेते अब्दुल रौफ कुरेशी ,वसीम तांबोळी ,असिफ तांबोळी ,अकबर मुजावर ,उमर मुजावर ,सोनू कुरेशी ,कैफ कुरेशी यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले .

एम आय एम पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या सूचनेनुसार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकील मुजावर यांच्या मार्गदर्शनात पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धम्मराज साळवे ,युवा नेते खालिद मुजावर यांच्या नेतृत्वात राष्ट्रध्वज बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले यामध्ये पक्षाचे पदाधिकारी सदस्य आणि युवा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला १५० पेक्षा अधिक दुचाकी सहभागी होत्या सर्वांच्या हातामध्ये राष्ट्र ध्वज होता, सदर राष्ट्रध्वज बाईक रॅली पक्षाच्या खराळवाडी संपर्क कार्यालय पासून सुरवात करून HA येथील छत्रपती शिवाजी महाराज ,भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून संत तुकाराम नगर ,अजमेरा ,मोरवाडी ,पिंपरी चौक मार्गे संप्पन होऊन पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुन्हा जनसंपर्क कार्यालय येथे समारोप करण्यात आला सदर बाईक रॅली चे आयोजन युवा नेते खालिद मुजावर , अकबर मुजावर ,सोनू कुरेशी ,सोनू शेख ,सलीम शेख यांनी केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.