'एक दिवस बळीराजासाठीʼ या उपक्रमातून शासन पाठिशी असल्याचा विश्वास निर्माण करावा- कृषिमंत्री अब्दुल सत्तार

0 झुंजार झेप न्युज

'एक दिवस बळीराजासाठीʼ या उपक्रमातून शासन पाठिशी असल्याचा विश्वास निर्माण करावा- कृषिमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद,दि.10: शेतकरी बांधव विविध अडचणींना सामोरे जात शेती करीत असतो. ‘एक दिवस बळीराजासाठीʼ या उपक्रमातून शेतकरी बांधवाच्या मनातील निराशा दूर व्हावी व शासन आपल्या पाठिशी असल्याचा विश्वास निर्माण करावा, असे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषि अधिका-यांच्या बैठकीत आज केले.या बैठकीस औरंगाबाद विभागाचे कृषि सहसंचालक डॉ. दिनकर जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. देशमुख, कृषि विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ. किशोर झाडे, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे डि.जी हिंगोले, तहसिलदार चव्हाण यांच्यासह कृषि सहायक उपस्थित होते.

शेतक-यांशी थेट बांधावर जावून संवाद साधत असतांना त्यांना येणा-या अडी-अडचणी जाणून घ्याव्यात, विचारपूस करावी. या उपक्रमातून अधिका-यांनी भेट दिलेल्या अहवालातून शेतकरी बांधवांसाठी कृषि विभागाबरोबरच इतर विविध विभागाच्या योजना समन्वयातून राबविण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या. एक दिवस बळीराजासाठी उपक्रमात जिल्हाधिकारी, विविध विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था, कृषि महाविद्यालये यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे मंत्री सत्तार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.