मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
जालना,दि.15 : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम, शनिवार, दि.17 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी ठीक 9-00 वाजता राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक, टाऊन हॉल, जुना जालना येथे होणार आहे.
या कार्यक्रमास सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित रहावे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी कळविले आहे.

