भाऊसाहेब काळे यांची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या प्रशासक पदी निवड
विहामांडवा,प्रतिनिधी किशोर धायकर पैठण : तालुक्यातील विहामांडवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या प्रशासक पदी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब काळे यांची निवड झाली.पैठण विहामांडवा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायची सर्वात मोठी आहे. संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर शासनाच्या निदर्शनानुसार प्रशासकाची नेमणूक सहाय्यक निबंधक अनिल पुरी यांनी केली.
दि १३ रोजी भाऊसाहेब काळे याची अध्यक्ष, उपाध्यक्ष पदी दिनकर बाबर तर सदस्य पदी संजय गाभुड यांची निवड झाली. यांनी सोसायटी च्या सदस्यांच्या उपस्थिती पदभार स्वीकारला. यावेळी संस्थेचे सचिव दत्तात्रय घोरपडे याची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राजेंद्र गाभूड,प्रल्हाद एखंडे,सतिष काळे,लक्ष्मण राऊत,बबनराव बोडखे, विलास संत, बाळासाहेब धामुर्डे,राजू पवार, बाळासाहेब शिंदे, माऊली रसाळ,शिवाजी बोडखे, दिपक येवले,संपत करताडे,चैतन्य येवले, किरण दहिवाळ, गणेश डुकरे,नितीन डुकरे, भाऊसाहेब डूकरे,राजेंद्र ठोंबरे,मदन डुकरे,मुन्ना भिंगारे,कल्पेश पवार,दत्ता गाभुड,विशाल डुकरे,आबा गाभुड, भागवत शिंदे,सौरभ तांबे,वैजनाथ तांभूरे, संकेत जाधव व गावातील पञकार बांधव यांची उपस्थिती होती.


