पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या निवासस्थानी थाळीनंद आंदोलन करण्यात येणार : सचिन काळभोर

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या निवासस्थानी थाळीनंद आंदोलन करण्यात येणार : सचिन काळभोर 

पिंपरी चिंचवड,दि.06: महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह ह्यांच्या निवासस्थानी थाळीनाद आंदोलन करुन चप्पल बूट हार भेट देण्यात येणार आहे.निगडी येथील आण्णा भाऊ साठे बस स्टॉप शेजारी रेड झोन एरिया मध्ये बेकादेशीर बांधकाम करून शौचालय व चार दुकान गाळा बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांच्या निवासस्थानी थाळीनाद आंदोलन करुन चप्पल बूट हार भेट देण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अंतगत विनामूल्य जागा देण्यात आली.

त्या ठिकाणी शौचालय व चार दुकान गाळा बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले करोडो रुपये किमतीच्या जागा विनामूल्य स्मार्ट सिटी अंतगत देण्यात आल्या असून रेड झोन एरिया मध्ये सामान्य नागरिक ह्यांनी बांधकाम केले तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन कारवाईचा बडगा उगारत आहे. दुसरीकडे स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन रेड झोन एरिया मध्ये बेकादेशीर बांधकाम प्रकरणी पाठबळ देत आहे कायदा सर्वांना सारखा असतो दुजा भाव नको असे सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यानी म्हटले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.