‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद

0 झुंजार झेप न्युज

नुतन शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केल्या मराठी कविता

नवी दिल्ली,24 : लहान माझी बाहुली मोठी तिची सावली............., मामाच्या गावाला जाऊ या......., आई, आई करना गं भेळ....... असावा सुंदर चॉकलेटचा बंगला....... अशी एका पेक्षा एक अजरामर कविता पहिली ते बारावी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या. कविता स्पर्धेला नुतन शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने वैविद्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. याअंतर्गत आज येथील नुतन मराठी शाळेत कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पहिली ते बारावीपर्यंच्या एकूण 23 विद्यार्थ्यांनी कविता स्पर्धेत भाग घेतला.

मूळ हिंदी भाषिक असणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांनी अभिनयासह पाठांतर करून गेय स्वरूपात मराठी कविता सादर केल्या. प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना रोख आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.या कविता स्पर्धेस पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्र सदनचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर, सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे हे उपस्थित होते.

नुतन मराठी शाळेचे प्राचार्य गुलशन नागपाल, शिक्ष‍िका नीना तेंडुलकर, श्रीमती भावना बावने, श्रीमती सुषमा पानसे या कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून मेहनत करवून घेतली.इयत्ता नववीतील वर्गातील नुरसबा या विद्यार्थींनीचा या कविता स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. सातव्या वर्गातील दिवांशू गोयल आणि निखिल या विद्यार्थ्यांचा अनुक्रमे व्दितीय आणि तृतीय क्रमांक आला.

‘साहित्य आणि मराठी भाषा’ विषयावरील व्याख्यानाचे झाले प्रसारण

दिल्ली येथील लेखिका, ग्रंथयात्रा हे यूट्युब चॅनलच्या होस्ट, वक्ता तसेच कॅनडा दूतावास येथील वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी श्रीमती अर्चना मिरजकर यांचे ‘साहित्य आणि मराठी भाषा’ विषयावर आज महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून प्रसारण करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.