रत्नागिरी शहरातील भव्य रोजगार मेळाव्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

0 झुंजार झेप न्युज

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला सविस्तर आढावा

रत्नागिरी,दि.11: राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाद्वारे शहरातील रा.भा. शिर्के प्रशाला, माळनाका येथे रविवार 12 फेब्रुवारी 2023 रोजी भव्य रोजगार महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. आज जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष भेट देवून भव्य रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने सुरु असलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी परिक्षीत यादव, कोकण विभागाचे उद्योग सहसंचालक सतीश भामरे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, रायगड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या, पालघर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उध्दव माने इतर विभागांचे अधिकारी तसेच युवा हब एजन्सीचे किरण रहाणे व त्यांची टिम उपस्थित होते.या रोजगार मेळाव्यात कोकण विभागातील विविध जिल्हयातील 150 पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार आहे. जिल्हयातील तरुण तरुणींना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. हा मेळावा सकाळी 08 ते सायंकाळी 05 वाजेपर्यंत रा. भा. शिर्के प्रशाला, शामराव पेजे चौक, जुना माळनाका, रत्नागिरी येथे होणार आहे.तरी जिल्हयातील तरुण- तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.