थेरगाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका रुग्णालय येथील बेशिस्त उद्धट वर्तन करणाऱ्या कर्मचारी प्रितम गायकवाड याचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी : सामाजिक कार्यकर्ते युनूस पठाण

0 झुंजार झेप न्युज

थेरगाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका रुग्णालय येथील बेशिस्त उद्धट वर्तन करणाऱ्या कर्मचारी प्रितम गायकवाड याचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी : सामाजिक कार्यकर्ते युनूस पठाण 

पिंपरी चिंचवड,दि.27: पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी अधिकृत रुग्णालय " थेरगाव रुग्णालय " येथील विषयांकित कर्मचारी नामे श्री प्रीतम गायकवाड सदर इसमांकडून दिनांक २३ डिसेंबर २०२३ रोजी साधारणपणे रात्री उशीरा अंदाजे ९ - ते १० दरम्यान माझ्याशी नाहक विनाकारण हुजजत घालत अंगावर धावून जात अश्लील शिवीगाळ बरोबरीने मला तसेच माझ्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी देऊन संपवण्याची भाषा करीत माझ्या अंगावर धावून येत मला प्रचंड अपमानित केल्याने सदर माझे व माझ्या कुटुंबीयांचे सदर व्यक्तीमुळे न भरून येणारे नुकसान झाले आहे यामुळे सदर रुग्णालयात प्रशासनातील दोषी इसम व त्याच्याशी संलग्न असणाऱ्या त्याला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच त्याच्या मित्रपरिवार परिवाराकडून माझ्या परिवाराला व मला धोका निर्माण झाला आहे . तरी सदर ईसम हा गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याने तसेच त्याच्या विरुद्ध सदर घटने संदर्भात मी थेरगाव रुग्णालय प्रशासनाला लेखि कळवून तसेच वाकड पोलीस स्टेशन येथे रितसर दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल केला आहे. 

तरी सदर इसमा विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई अति तात्काळ करण्यात यावी सदर प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने सदर प्रकरणाची दखल न घेतल्यास हालगर्जीपणा वेळ काढून पणा केल्यास मी थेरगाव रुग्णालय प्रशासन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय प्रशासन यांचे व सर्व जबाबदार यांचे विरुद्ध पिंपरी चिंचवड मधील सर्व बहुजन मुस्लिम लहुजी शिव शाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या सर्व समावेशक सामाजिक राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पिंपरी चिंचवड मधील सर्व महिला संघटना महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर तसेच थेरगाव रुग्णालय प्रशासनावर बेधडक जन आक्रोश बेमुदत धरणे आंदोलन व विराट स्वरूपाचा मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध नोंदविन याची गांभीर्यपूर्वक नोंद घेऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.