पालकांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पैठण तालुक्याचा दबदबा कायम

0 झुंजार झेप न्युज

पालकांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पैठण तालुक्याचा दबदबा कायम

         

पैठण,दि.18: जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेने व जयश्री चव्हाण यांच्या अथक प्रयत्नाने जिल्हा परिषद शाळेतील पालकांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धां दिनांक 15-01-2024 ते दिनांक:17-01 -2024 दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संकुल येथे घेण्यात आल्या.छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने पालकांच्या राज्यातील पहिल्या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवार दिनांक-17 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले.                                      

स्पर्धेचे बक्षीस वितरण मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार,विक्रम काळे,जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी,विकास मीना,प्राथमिक शिक्षणाधिकारी,जयश्री चव्हाण, यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी उपशिक्षणाधिकारी,गीता तांदळे,सचिन शिंदे,लईक सोफी, संगीतासावळे,संगीतासाळुंके,ठाकुर,गटशिक्षणाधिकार,श्रीराम केदार,व सर्व तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तारअधिकारी,वासिंबे, अनिल पुदाट,व सर्व शिक्षण विस्तारअधिकारी,यांची उपस्थिती होती.पैठण तालुक्याला सांघिक खेळात मिळेलेली पारितोषिके खालील प्रमाणे1)खो-खो(पुरुष गट)विजेता[प्रथम क्रमांक] 2) कबड्डी(पुरुष गट)उपविजेता,[द्वितीय क्रमांक]3)कबड्डी(महिला गट) उपविजेता[द्वितीय क्रमांक] 4)रस्सीखेच(महिला गट)उप विजेता [द्वितीय क्रमांक] पटकावला,तर वैयक्तीक खेळात 5)गोळा फेक(पुरुष गट)विजेता,[प्रथम क्रमांक] 6)गोळा फेक (महिला गट)उपविजेता,[द्वितीय क्रमांक] 7)लिंबू चमचा(महिला गट)विजेता [प्रथम क्रमांक] 8) रनिंग 100 मिटर(पुरुष गट) उपविजेता [द्वितीय क्रमांक] पटकावला.या वेळी संघ व्यवस्थापक,समशेर पठाण, नितीन कपटी,होते कोच म्हणून, बाबासाहेब येळे,शेषराव गर्जे,केंद्र प्रमुख,बळीराम भुमरे,हे होते,तर मुख्याध्यापक,चंद्रकांत शेळके, मुख्याध्यापक,चंद्रकांत घोडके, मुख्याध्यापक,गायकवाड,संजय गवांदे,अमोल शेळके,ईश्वर खंदारे, मनोज सरग,लाटे,किशोर तोतरे, धनंजय साखरे,अल्का खोसे, मंगला मदने,सुनिता पवार, आष्टिकर,इत्यादी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.