कर संकलन विभागाची दमदार कामगिरी सुरूच!

0 झुंजार झेप न्युज

• सातशे कोटींचा टप्पा पार

• सुमारे सव्वा चार लाख लोकांचे आयुक्तांनी मानले आभार

• सहा लाख 15 हजार मालमत्ता धारकांपैकी 4 लाख 21 हजार मालमत्ता धारकांनी भरला कर

पिंपरी-चिंचवड,दि.31: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाची दमदार कामगिरी सुरूच असून दहा महिन्यात तब्बल सातशे काेटी रूपयांचा टप्पा पार केला आहे. उर्वरित दोन महिन्यात जास्तीत-जास्त कर वसूल करण्यासाठी विभागाने आता थकबाकीदारांच्या मालमत्ता जिथे सील करता येणे शक्य नाही त्या ठिकाणी जप्त' करण्याचा प्रथमच मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी मालमत्ता जप्त हाेऊ नये, यासाठी त्वरित कर भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सहा लाख 15 हजार मालमत्ता आहेत. यापैकी तब्बल 4 लाख 21 हजार मालमत्ता धारकांनी 716 कोटी 40 लाख रूपयांचा भरणा करून शहर विकासात योगदान दिले आहे. त्याबद्दल पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी या जबाबदार आणि जागरूक करदात्यांचे मनस्वी आभार मानले आहेत.

जनजागृती, वारंवार आवाहन, जप्ती पूर्व नाेटीस, माेबाईलवर एसएमएस पाठवून थकबाकीदारांना कर भरण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही कर न भरणा-या मालमत्ता धारकांबाबत कठाेर पाऊले उचलण्यास कर संकलन विभागाने सुरूवात केली आहे. 

शहरात थकबाकीदारांमध्ये रहिवाशी मालमत्तांची संख्या माेठी आहे. अशा मालमत्ता धारकांना पाच वेळा भेटी देऊन कर भरण्याबाबत सूचना केल्या, मालमत्ता जप्त हाेण्याचा इशारा दिला. त्यानंतरही थकबाकीदार नागरिक कर भरण्यास प्रतिसाद देत नाहीत. वास्तविक मानवतेच्या दृष्टीकाेनातून रहिवाशी सदनिका महापालिका सील करत नाहीत. मात्र, आता यापुढे अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. मात्र ही जप्ती मालमत्ता सिल न करता किंवा कुठलीही जंगम मालमत्ता जप्त न करता केली जाणार आहे. त्यासाठी सदर मालमत्तेवर जप्ती अधिपत्र डकवले जात आहे. रहिवास करत असलेले थकबाकीदार आर्थिक क्षमता असूनही कुठल्याही पाठपुराव्याला प्रतिसाद देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा रहिवाशी मालमत्तांकडे जवळपास 300 कोटीच्या वर थकबाकी आहे. यापूर्वी बंद असलेल्या रहिवाशी सदनिका बंद असल्याने सील केल्या होत्या. गत वर्षी त्यांची संख्या 70 च्यावर होती. यावर्षी अशा जप्त केलेल्या मालमत्तांची संख्या 100 च्यावर गेली आहे आणि ही कारवाई 31 मार्चपर्यंत चालू राहणार आहे.

चौकट- 01

283 मालमत्ता जप्त; 98 मालमत्तांना अधिपत्र डकविले

वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्या 17 झोनमधील तब्बल 283 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यापैकी 98 निवासी मालमत्तांना अधिपत्र डकविले आहे. यानंतरही थकीत कर न भरल्यास संबंधित मालमत्ता धारकांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्याचा इशारा कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

चौकट -2

25 मालमत्तांच्या लिलावाची प्रकिया चालू

महापालिकेने थकबाकी असलेल्या 283 मालमत्ता जप्त केल्या आहेत. यामधील 98 मालमत्तांचे मूल्यांकन करण्यात येत आहे. त्यापैकी 25 मालमत्तांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्यात या मालमत्तांचा जाहीर लिलाव लवकरच करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित मालमत्तांचे वेगाने मूल्यांकन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

 चौकट- 3

28 नळ कनेक्शन खंडीत

थकीत कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांचे महापालिकेच्या वतीने आता नळजोडणी तोडण्यासारखी नाईलाजाने कठोर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत 25 मालमत्ता धारकांचे नळजोड खंडित करण्यात आले आहेत.

चौकट-4

तंत्रज्ञानाचा खुबीने वापर; एका आठवड्यात 14 कोटी कर वसूल

शहरात 5 ते 50 हजार रूपयांची पाच ते दहा वर्षांपासून थकबाकी असलेल्या 1 लाखांच्यावर मिळकती आहेत. अशा मिळकत धारकांना कर संकलन विभागाच्या वतीने त्यांच्या मोबाईलवर थेट एसएमएसद्वारे जप्ती पूर्व नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच याबरोबरच त्याच लिंकमध्ये थकीत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे एका आठवड्यात तब्बल 13 ते 14 कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे.

चौकट-

असा आला रूपया

असा आला कर

ऑनलाईन - 430 कोटी 48 लाख

विविध ॲप - 8 कोटी 93 लाख

रोख - 96 कोटी 57 लाख

धनादेशाद्वारे - 88 कोटी 18 लाख

इडीसी- 8 कोटी 37 लाख

आरटीजीएस - 37 कोटी 47 लाख

चौकट-5

वाकड झोनमध्ये सर्वाधिक कर भरणा-यांची संख्या

शहरात कर संकलनासाठी महापालिकेचे 17 झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक म्हणजे 56 हजार मालमत्ता धारकांनी 110 कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. त्याखालोखाल थेरगाव, चिखली, भोसरी, सांगवी चिंचवड, मोशी झोनमध्ये कराचा भरणा झाला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये फक्त 6 हजार 12 मालमत्ता धारकांनी 15 कोटी 90 लाखांचा कर भरणा केला आहे.

लाभ होईल. विभागाला आवश्यक असणारे एम एस एफ जवान, जप्ती वाहने आणि प्लंबर तातडीने उपलब्ध करून. देण्यात आलेले आहेत. बांधकाम परवानगी विभाग आणि कर संकलन विभाग यांचे एकात्मिकरण अंतिम टप्प्यात आलेले आहे. जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया वेगवान करण्यासाठी गवर्नमेंट व्हॅल्यूअर यांचे पॅनल नेमण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामुळे जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया वेगवान होईल.

:- प्रदीप जांभळे पाटील

अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

 कोट:- 3

माननीय आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय अतिरिक्त आयुक्त यांच्या निर्देशानुसार वसुली मोहीम ही अधिकाधिक तीव्र करण्यात येत आहे. सध्या कर संकलन मुख्य कार्यालयाकडून गुगल मिटच्या माध्यमातून रोजच्या रोज आढावा घेतला जातो आहे. मालमत्ता कर नोंदणी अभियान सुद्धा सध्या वेगाने चालू आहे. येत्या वर्षभरात सर्व मालमत्ता धारकांना सर्व सवलती, सुविधा घर बसल्या मिळतील अशा पद्धतीने माहिती संकलित करण्यात येत आहे. नागरिकांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. यंदाही गतवर्षीपेक्षा अधिक वसुली करून नवा विक्रम नोंदवण्याचा आमचा प्रयत्न असेल.

:- नीलेश देशमुख सहायक आयुक्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.