“PCMCचा 16 कोटींचा निर्णय वादात! सचिन काळभोरांची तक्रार”

0 झुंजार झेप न्युज

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस तब्बल १६ कोटींचा निधी; तक्रारीनंतर वाद चिघळला

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस गेल्या काही वर्षांत टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,

  • सन २०१८ ते २०२१ दरम्यान ५ कोटी रुपये
  • सन २०२२ ते २०२३ दरम्यान ५ कोटी रुपये
  • सन २०२४ ते २०२५ दरम्यान ५ कोटी रुपये
  • निवडणुकांनंतर अतिरिक्त १ कोटी रुपये

असा एकूण १६ कोटी रुपयांचा निधी स्थायी समिती सभेत ठराव मंजूर करून देण्यात आला आहे.

दरम्यान, निगडी प्राधिकरण येथील या समितीला दिलेल्या निधीवरून आता वाद निर्माण झाला आहे. भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या प्रकरणात गंभीर आक्षेप घेत थेट राज्य सरकारकडे तक्रार दाखल केली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिकेला सेवा भावी संस्थांना केवळ ३ लाख रुपयांपर्यंतच अनुदान देण्याचा अधिकार असताना, इतक्या मोठ्या निधीची मंजुरी देण्यात आल्याने नियमभंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी महापालिका आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्याकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आता प्रशासन आणि राज्य सरकार या प्रकरणावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.