पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी..

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी..

पिंपरीदि.१९ एप्रिल २०२६  :- बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांनी नागरिकांना स्त्री-पुरुष समानतेबरोबरच एकात्मताबंधुताअहिंसा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश दिला,प्रत्येक माणसाला जीवन जगण्याची समान संधी मिळावी त्यात कोणताही भेदभाव करण्यात येऊ नये याकरिता सतत कार्यरत असणारे महात्मा बसवेश्वर यांच्या व्यापक विचारसरणीचा वारसा सर्वांनी जोपासावा असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्यील महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अभिवादन कार्यक्रमास कर्नाटकातील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरणू सलगर यांच्यासह उपमहापौर शर्मिला बाबरविरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईरमहापालिका जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे पदाधिकारीविविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीकार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निगडी येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास आमदार शरणू सलगरउपमहापौर शर्मिला बाबरविरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईरक्रीडाकलासाहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे,माजी उपमहापौर तथा नगरसदस्या शैलजा मोरे,नगरसदस्य अमित गावडेमाजी नगरसेवक नारायण बहिरवाडेमोरेश्वर भोंडवेजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.