“लोकसहभाग हीच शहर विकासाची ताकद” – महापौर रवि लांडगे

0 झुंजार झेप न्युज

निगडी येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन....

झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण करण्याची नागरिकांनी घेतली शपथ...


पिंपरीदि. ३ एप्रिल २०२६ :लोकसहभागातून उभे राहणारे उपक्रम हीच शहर विकासाची खरी ताकद आहेनिगडी परिसरातील नागरिक आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार झालेला ऑक्सिजन पार्क हा एक अनोखा आदर्श असा पर्यावरणपूरक उपक्रम आहे असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी निगडी प्राधिकरण येथील ऑक्सिजन पार्कच्या उद्घाटन प्रसंगी केले.

निगडी प्राधिकरण येथील सेक्टर २६ मध्ये स्थानिक रहिवासी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सहभागातून विकसित करण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले,त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास आमदार अमित गोरखेउपमहापौर शर्मिला बाबरविरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईरमहापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीनगरसदस्या शैलजा मोरेअनुराधा गोरखेनगरसदस्य अमित गावडे यांच्यासह महापालिका मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, कार्यकारी अभियंता सुनील पवारदिलीप भोसलेजयकुमार गुजर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिकतसेच राजेंद्र बाबरविजय नाईकधनंजय शेडबाळे,सुर्यकांत मुथियान व ऑक्सिजन पार्क उभारण्यात सक्रिय सहभाग नोंदविणारे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले कीपर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असून अशा हरित प्रकल्पांमुळे पिंपरी चिंचवड शहर हे अधिक आरोग्यदायी आणि सुंदर बनेल. तसेच शहरातील २०३ उद्यानांपैकी २५ ते ३० उद्यानांमध्ये अशी संकल्पना लोकसहभागातून राबविण्यात येईलअसेही त्यांनी बोलताना सांगितले.

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच माझी वसुंधरा’ शपथ घेऊन पर्यावरण संवर्धनाचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

 

माझी वसुंधरा शपथ

"आम्ही भारताचे सुजाण नागरिक म्हणून शपथ घेतो की,आम्ही भारतमातेला आणि या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करूया वसुंधरेला आणि पर्यावरणाला आमच्याकडून कोणतीही हानी होणार नाहीयाची आम्ही दक्षता घेऊ. आम्ही या देशाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी कटिबद्ध राहू आणि आमच्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम आम्ही करणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला आणि वसुंधरेला स्वच्छसुंदरहरित आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करूअशी शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली. शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी  केले.

 

कोट :

शहरातील प्रत्येक प्रभागात हरित क्षेत्र वाढावेयासाठी प्रशासन आणि नागरिक एकत्र येत आहेत. लोकसहभागातून साकारलेले ऑक्सिजन पार्क हे भावी पिढ्यांसाठी मौल्यवान ठेवा आहे.

— शर्मिला बाबरउपमहापौरपिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

कोट :

वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर हरित क्षेत्रांचे जतन व संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांच्या सहभागातून साकारलेला हा प्रकल्प पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल आणि हरित शहराच्या संकल्पनेला बळ देईल.

— डॉ. विजय सूर्यवंशीआयुक्तपिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.