पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; कारवाईची सचिन काळभोर यांची मागणी
पिंपरी चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि धमकीची भाषा वापरणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याचा दावा करत, संबंधित व्यक्तीविरोधात तातडीने चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.
या संदर्भात पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्तांकडे निवेदन देत, सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओची सत्यता तपासून संबंधित व्यक्तीची ओळख पटवावी आणि कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या सर्वोच्च संवैधानिक व्यवस्थेतील महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर अशा प्रकारे धमकी किंवा आक्षेपार्ह वक्तव्यांचा प्रसार होणे ही गंभीर बाब असल्याचे सचिन काळभोर यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची पिंपरी चिंचवड पोलिसांनी तातडीने दखल घेऊन संबंधित व्हिडिओची चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.
— सचिन काळभोर
भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता, पिंपरी चिंचवड शहर
