पुणे, दि. ७ ऑगस्ट २०२६ : पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची पहिली मासिक सभा आज शुक्रवार दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी मा.महापालिका आयुक्त कार्यालय येथे संपन्न झाली

0 झुंजार झेप न्युज


 पुणे, . ७ ऑगस्ट २०२६ : पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची पहिली मासिक सभा आज शुक्रवार दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी मा.महापालिका आयुक्त कार्यालय येथे संपन्न झाली

सभेच्या अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष मा. श्री. नवल किशोर राम हे होते. यावेळी सह महापालिका आयुक्त तथा सदस्य सचिव, वृक्ष प्राधिकरण, डॉ. अशोक दि. घोरपडे तसेच संबंधित महापालिका सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी आणि हॉर्टिकल्चर मिस्त्री उपस्थित होते.
तसेच वृक्ष प्राधिकरण समितीवर निवड झालेले नवनिर्वाचित सदस्य मा. श्रीमती रूपाली सचिन पवार, मा. श्रीमती कोमल सारंग नवले, मा. श्रीमती उज्ज्वला सुभाष जंगले, मा. श्री शैलेंद्र जयवंत बनसोडे, मा. श्रीमती स्नेहा नामदेव माळवदे, मा. श्रीमती अंजली विनोद ओरसे आणि मा. श्री विशाल हरी मलके यांची उपस्थिती होती.
सभेमध्ये वृक्ष प्राधिकरणाच्या कामकाजाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये वृक्ष प्राधिकरण समितीवरील नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती, नवनिर्वाचित सदस्यांना महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मधील तरतुदींबाबत माहिती देणे, तसेच अध्यक्षांच्या मान्यतेने आयत्या वेळेस मांडण्यात आलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
पुणे शहरातील वृक्षसंपदेचे संरक्षण, संवर्धन व जतन, वृक्ष संरक्षणासंदर्भातील कायदेशीर तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी तसेच शहरातील हरित क्षेत्राचे संवर्धन याबाबतही सभेत आवश्यक चर्चा करण्यात आली.
पुणे शहराची पर्यावरणीय समृद्धी आणि हरित वारसा जपण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रभावी नियोजन, समन्वय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.