आष्टीत चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली; एकजण जागीच ठार

0 झुंजार झेप न्युज

आष्टी : तालुक्यातील पोखरी जवळ शुक्रवारी (ता.२७) 
पहाटेच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.
जामखेड-आष्टी महामार्गावर झालेल्या या अपघातात चारचाकीमध्‍ये (क्र.एम.एच.16 ए.क्यु 5050) चालक आणि दोन प्रवासी होते. आष्टी तालुक्यातील पोखरी नजीक आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्‍यामुळे चारचाकी पोखरी येथील पुलानजीक खाली उतरुन झाडावर जोराने आदळली.
चालक विशाल उर्फ बंटी काकासाहेब पवार (वय वर्ष 30 रा.जामखेड) यांचा जागीच मृत्यू झाला. पवन गायकवाड (वय 31 रा.जातेगाव), आकाश अभिमन्यू उगले (वय 32, रा. पोलीस स्टेशन जवळ, जामखेड) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.