जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ७०० कोटीचे कर्ज माफ होणार

0 झुंजार झेप न्युज

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.जालना जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना सातशे कोटी रूपयांची कर्ज माफी मिळणार आहे. कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सातत्याने अल्पसा पाऊस होत आहे. त्यातच रासायनिक खते, बीयाणांच्या वाढलेल्या किंमती यामुळे शेतकऱ्यांना शेतीव्यवसायात फार मोठा तोटा सहन करावा लागत आहे. संपूर्ण शेती व्यवसायच आर्थिक अडचणीत सापडला आहे. प्रंचड झालेल्या कर्जामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कुंटुबियांचा उदर्हनिर्वाह करणे कठीण झाले होते.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी अशी मागणी केली जात होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यतचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. शेतकरी वर्गातून या निर्णयाचे स्वागत होत असून जालना जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना तब्बल सातशे कोटी रुपयांची पीक कर्जमाफी मिळणार आहे.
जालना जिल्ह्यात विविध बॅंकामधून सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीच्या निर्णयामुळे जिल्यातील ज्या शेतकर्यांनी 30 संप्टेबर 2019 पर्यंत पीक कर्ज घेतले आहे ते सर्व पीक कर्ज माफ होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी पुनर्गठन करून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील लवकरच एक विशेष योजना सरकार आणणार.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.