सोमवारी (दि. 30 डिसेंबर) पहाटे बारा ते मंगळवारी (दि. 31 डिसेंबर) रोजी दुपारी दोन पर्यंत एच.ए कंपनी समोरील मेट्रोच्या पिलरपासून पिंपरीहून पुण्याकडे जाणा-या मार्गावरील वाहतूक खराळवाडी येथून मुंबई-पुणे मार्गावरील ग्रेड सेपरेटरमध्ये वळवण्यात आली आहे. हा बदल नाशिक फाट्यापर्यंत राहील.
खराळवाडी येथून एच. ए कंपनी वसाहतीकडे जाणा-या वाहनांना सेवा रस्त्याने जाता येईल. एच ए कंपनीसमोरील अंडरपास नेहरूनगरकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला राहील.
तसेच गुरुवारी (दि. 2 जानेवारी) सकाळी सात ते शनिवार (दि. 4 जानेवारी) सकाळी सातपर्यंत मेट्रोच्या कामासाठी एच ए कंपनी समोरून पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक नाशिक फाटा येथून उलट दिशेने खराळवाडी पर्यंत जाईल. त्यानंतर पुणे मुंबई लेनवरून वाहतूक सुरळीत होईल.

