'शरद पवारच राजकारणातील चाणक्य आणि चंद्रगुप्तही'

0 झुंजार झेप न्युज

‘कॅन्सरसारख्या आजाराला परतवून लावणाऱ्या पवार यांनी गेल्या ५० वर्षांत राजकारणात चंद्रगुप्त तयार केला नाही. कारण, अशी बाब लक्षात येत आहे की खुद्द शरद पवार हेच चंद्रगुप्तही आहेत आणि चाणक्यही,’ असे व्यक्तव्य सिने अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड कलारंग सांस्कृतिक कला संस्थेतर्फे अभिनेते नाना पाटेकर यांची मुलाखत आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले, राजकारण कसं करावं हे शरद पवारांना ठाऊक असल्याची बाबही नानांनी यावेळी बोलताना सांगितली. तसेच जो माणूस कॅन्सरसारख्या आजारालाही परतवून लावतो, त्याच्यापुढे इतरांचं काय म्हणत पवारांच्या जिद्दीला नानांनी दाद दिली.
तसेच पुढे बोलताना पाटेकर म्हणाले, ‘भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षाची नियमावली चांगली आहे. फक्त त्याची अंमलबजावणी आणि पायमल्ली हाच फरक. विजयबाई हा पक्ष मला मिळाला. तो माझ्यासाठी महत्वाचा,’ असे ते म्हणाले.
दरम्यान, ‘आपल्याला पाच वर्षाने मतदान करण्याचा हक्क मिळतो. मात्र आपण त्यांचे धिंडवडे काढतो. कारण आपण फक्त मत देतो. पण त्यांना प्रश्न विचारत नाही,’ असे मत देखील पाटेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.