झुंजार झेप न्युज | ज्योतिषशास्त्र
▪ मेष - आज आपल्या अंतर आत्म्याचा आवाज ऐकण्यासाठी आपण आतुर व्हाल. त्यामुळे आज आपण आपल्या कामाचे बारकाईने नियोजन कराल. आज आपला दिवस मिश्र फलदायी असेल. आजच नव्हे तर एरवी सुद्धा आपण अपयशाला हसतमुखाने सामोरे जात असता असे गणेशास वाटते.
▪ वृषभ - एक व्यवस्थापक म्हणून आपण आपल्या सहकार्यांच्या बऱयाच पुढे निघून जाल असे भाकीत गणेशा करीत आहे. आपण जवळीक साधण्यासाठी काही अंशी मवाळ धोरणाचा अवलंब करून आपली हुकूमशाही पद्धत सोडून लोकशाही मार्गाने निर्णय घेण्याची प्रक्रिया राबवाल. त्याने आपणास प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा यशाची चव चाखण्यास मिळेल, असे गणेशास वाटते.
▪ मिथुन - जवळचे संबंध वाढविण्यासाठी विशेष काळजी घेणे किती गरजेचे असते ह्याची जाणीव आज आपणास होईल असे गणेशाचे भाकीत आहे. आज आपण नवीन जवाबदाऱ्या स्वीकाराल व आजच्या व्यवहारात भरघोस फायदा मिळवाल. आज आपल्या स्वाथ्याकडे विशेष लक्ष द्या.
▪ कर्क - कल्पनाविश्वात रमणे आपणास आवडेल. आपल्यावर धार्मिक वृत्तीचा प्रभाव पडेल. आपली कल्पनाशक्ती आपणास रहस्यमय उंचीवर घेऊन जाईल. आपण मंदिर, मशीद किंवा चर्च येथे देवाशी संवाद साधू शकाल. आपल्या अनुभवातून आपण शिकण्याचा प्रयत्न कराल.
▪ सिंह - टाळ्यांची उब घेण्यास तयार राहा. कामाच्या ठिकाणी आपण केलेल्या कामाची बहूप्रतिक्षीत अशी पावती मिळेल. हे विशेषतः नवीन प्रकल्पासाठी वर्णी लागण्याने तसेच आपल्या सहकाऱयांच्या पाठिंब्याने व वरिष्ठांच्या शुभेच्छेने होईल. एक लक्षात ठेवा कि कामाची सुरवात म्हणजे अर्धे काम फत्ते. तेव्हा त्याच जोमाने कामास लागून यशस्वी व्हा असे गणेशा सांगत आहे.
▪ कन्या - मागील यशाचे चिंतन केल्याने नजीकच्या काळात बरेच काही साध्य करण्यासाठी साधनसंपत्ती गोळा करण्यात आपणास मदत होईल. नवीन संपर्काची यशाच्या मार्गावर नेण्यास महत्वाची मदत होईल.आपल्या प्रेमळ स्वभावामुळे लोकात सहजपणे मिसळून जाण्यात आपणास मदत होत असल्याचे गणेशा सांगत आहे.
▪ तूळ - आज आपले शत्रू किंवा प्रतिस्पर्धी आपल्या प्रतिष्ठेला डागाळण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा आपल्या कार्यक्षेत्रात आपणास सावध राहावे लागेल, असे गणेशा सांगत आहे. व्यापारातील करार किंवा देवाण - घेवाणीत तडजोड करताना आपणास अत्यंत सावध राहावे लागेल. आज आपली प्रियव्यक्ती आपणापासून दुरावल्याची जाणीव आपणास होईल.
▪ वृश्चिक - दीर्घकाळा पासून प्रलंबित असलेले घराचे नूतनीकरण आज सुरु होण्याची शक्यता आहे. काही कलात्मक वस्तू आपले लक्ष वेधून घेतील व त्यांचा उपयोग करून आपले घर सजविण्याची आपली इच्छा होईल. आपल्या घराच्या नूतनीकरणाचा छोटासा सोहळा साजरा करण्याचे नियोजन सुद्धा आपण कराल. खरंच आजचा दिवस छान आहे!
▪ धनु - आजचा दिवस सूक्ष्म दृष्टीने मनोरंजक असा असेल. आपण नेहमीच आकर्षक दिसता, पण आज इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्या पेहराव्याची जास्त काळजी घ्याल. आपल्या उठून दिसण्याने आज व्यवसाय खेचून आणाल.
▪ मकर - जर केलेला खर्च वाया जाऊन आपली पतपेढीतील शिल्लक आपल्या अपेक्षेहून कमी झाल्यास आज आपणास आनंदीत होण्याचे एक कारण मिळेल, असे गणेशा सांगत आहे. आवश्यक पैसे हाती पडल्याने आपल्या आर्थिक परिस्थितीचा आपण आनंद अनुभवाल. कामे नेहमी प्रमाणेच होत राहतील. फरक एवढाच असेल कि कामात काही बदल होऊन आपणास त्यात जास्त अनुकूलता लाभेल.
▪ कुंभ - घर किंवा वाहन घेण्याच्या विचारात आहात का ? असलात तर त्याची नोंदणी करण्यास आजचा दिवस उत्तम आहे. मात्र घाईगर्दीत खरेदी करू नका. खूप पैसे गुंतवावे लागणार असल्याने सावध राहण्यास गणेशा सांगत आहे. कदाचित आपण घर किंवा नोकरीत बदल सुद्धा कराल व ह्या सर्व प्रक्रियेचा आनंद घ्याल.
▪ मीन - एक चांगला दिवस आपली वाट पाहात आहे. नशिबाची साथ मिळाल्याने आपले काम नियोजित वेळेत आपण पूर्ण करू शकाल. अनेक दिवसांपासून कुटुंबासाठी आयोजित केलेली रजा आज कार्यान्वित होण्याची शक्यता असल्याचे गणेशा सांगत आहे.

