शिवभोजनासाठी आधारकार्डची सक्ती नाही- छगन भुजबळ

0 झुंजार झेप न्युज

मुंबई : महाविकास आघाडी सरकारतर्फे महाराष्ट्रातील गोरगरिब जनतेसाठी १० रुपयांत देण्यात येणार आहे. यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत होते. पण शिव भोजन थाळीसाठी आधार कार्डची गरज नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. शिव भोजन थाळीसाठी आधार कार्ड लागणार ही माहिती कुठून अली मला माहित नसल्याचे भुजबळांनी म्हटले.
शिवसेनेच्या संकल्पनेतूनच १० रुपयात थाळी ही योजनाही सुरू केली जात असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्याकडे असलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे आहे. शिव भोजन योजना सध्या मुंबई ते ठाण्यात 30-32 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर असणार आहे. यामध्ये एक अँप असणार आहे. ही योजना गरिबांसाठी असून सरकारी नोकरांनी फायदा घेऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
समाजातील गरीब वर्गासाठी येत्या २६ जानेवारीपासून राज्यात ही योजना सुरू केली जाणार आहे. यामध्ये मुंबईतील १५ ठिकाणांचा समावेश असेल. १० रुपयात थाळी केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून शहरी भागात ३५ रुपये, तर ग्रामीण भागात २५ रुपये अनुदान दिले जाणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.