पिंपरी-चिंचवडमधील घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांच्या बेड्या, तब्बल 22 आरोपी ताब्यात

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी-चिंचवडमधील घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पिंपरी: पिंपरी-चिंचवडमधील घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील सांगवी परिसरातून घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

हे सर्व आरोपी सांगवी परिसरातील भैरवनाथ गॅस एजन्सीमधील कर्मचारी असून एकून 22 जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडून 14 टेम्पोमध्ये 312 गॅसच्या भरलेल्या आणि रिकाम्या टाक्या सामाजिक सुरक्षा पथकाने ताब्यात घेतल्या आहेत.

ताब्यात घेतलेल्या टोळीकडून अंदाजे 312 घरगुती गॅस हस्तगत केले आहेत. मुख्य गोडाऊनमधून इतर दुसऱ्या गोडाऊनमध्ये गॅस सिलेंडर घेऊन जाऊन तिथे कनेक्टरच्या साहाय्याने एका गॅस मधून एक ते दोन किलो गॅस दुसऱ्या मोकळ्या गॅस सिलेंडरमध्ये काढून घेत असत. असं करत पुन्हा, ते गॅस ग्राहकांना विकायचे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.