सूरतमध्ये काँग्रेसचा धुव्वा, AAP 2 नंबरचा पक्ष ठरण्याची शक्यता

0 झुंजार झेप न्युज

आप पक्षाने सुरत महानगरपालिकेत काँग्रेसला मागे टाकत दोन नंबरचा पक्ष होण्याकडे आपली वाटचाल सुरु केली आहे. 

गांधीनगर : गुजरातमध्ये सध्या महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी (Gujarat Municipal Election) सुरु आहे. एकूण 6 महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे जवलजवळ स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजपचा गड म्हणवल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने (APP) चांगली कामगिरी केल्याचं दिसतंय. आप पक्षाने सुरत (surat) महानगरपालिकेत काँग्रेसला मागे टाकत दोन नंबरचा पक्ष होण्याकडे आपली वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे आपचे सध्याचे हे यश पक्षविस्तार करण्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सूरतमध्ये मतमोजणी सुरु असून भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरतो आहे.

गुजरातमध्ये एकूण 6 महानगरपालिकेसाठी निवडणुका झाल्या. त्यांची आज मतमोजणी होत आहे. यामध्ये राजकोट, भावनगर, जामनगर, सूरत, अहमदाबाद आणि वडोदरा या महापालिकांचा समावेश आहे. या सर्व महापालिकांमध्ये भाजपची विजयी घोडदौड सुरु आहे. सध्या मतमोजणी सुरु असली तरी, भाजपला सर्व पालिकांमध्ये बहुमत मिळाल्याचे जवजवळ स्पष्ट झाले आहे. मात्र, उल्लेखनीय बाब म्हणजे तुलनने नवा म्हटल्या जाणाऱ्या आप या पक्षाने सुरतमध्ये चांगली कामगिरी केल्याचं दिसत आहे.

आपने काँग्रेसला मागे टाकत चक्क दोन नंबरचा सर्वांत मोठा पक्ष होण्याकडे आपली वाटचाल सुरु केली आहे. मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार सुरत महापालिकेच्या मतमोजणीत भाजप तब्बल 47 जागांनी पुढे आहे. तर आप पक्ष 9 जागांवर पुढे आहे. दुपारी 1 वाजता आप 18 जागांवर पुढे होता. मात्र, 2 वाजता आप काही वॉर्डामंध्ये मागे पडला असून सध्या तो 9 जागांवर पुढे. काँग्रेसचा विचार करायचा झाल्यास काँग्रेसच्या जागा कमी होताना दिसत असून काँग्रेसही सध्या 9 जागांवर पुढे आहे.

विजयर रुपाणी यांना मोठा झटका

दरम्यान, अहमदाबादमधील नाराणपुरा वॉर्डातील भाजपचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. गुजरातचे काँग्रेसचे नेते विजय रुपाणी यांच्या जिल्ह्यात म्हणजेच राजकोट येथे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. येथे काँग्रेस एकासुद्धा जागेवर आघाडीवर नाही. येथे सर्वच्या सर्व जागांवर भाजपने आघाडी घेतली असून विजय रुपाणी आणि काँग्रेससाठी हा मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार गुजरातमध्ये 6 महानगरपालिकांसाठी मतमोजणी होत असून, एकूण 576 जागांचे निकाल काही वेळात स्पष्ट होणार आहेत. सध्या भाजप 366 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस फक्त 51 जागांवर पुढे आहे.

2 वाजताची स्थिती

अमहदाबाद – भाजप 83, काँग्रेस 18 जागांवर पुढे

वडोदरा – भाजप 45 तर काँग्रेस 7 जागी आघाडीवर

राजकोट – सर्व 52 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर

सूरत – भाजप 47, काँग्रेस 9 तर आप 9 जागांवर आघाडीवर

भावनगर – भाजप 25 तर काँग्रेस 5 जागांवर पुढे

जामनगर – भाजप 36, काँग्रेस 5, तर बसपा 5 जागी आघाडीवर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.