कोरोना रोगाच्या वाढत्या संसर्गामुळे निमगाव येथील खंडोबा मंदिर माघ याञे निमित्त बंद राहाणार.
खेड (दावडी) कोरोना रोगाच्या वाढत्या संसर्गामुळे निमगाव येथील खंडोबा मंदिर माघ याञे निमित्त बंद राहाणार आहे तसेच शनिवार दि.२७ रोजी होणारी माघ पौर्णिमा याञा रद्द करण्यात आली आहे .भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये असे अवाहन करण्यात आले आहे निमगाव खंडोबा हे राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे दरवर्षी माघ व चैत्र पौर्णिमेला खंडोबा देवाची मोठी याञा भरते लाखो भाविक खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येत असतात तळी भंडारा कुलधर्म जागरण गोंधळ घालण्यासाठी मंदिर परिसरात मोठी गर्दी होते .यंदा माञ कोरोना रोगाचा फैलाव होऊ नये व तालुक्यात कोरोना बाधीत रुग्न संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या साठी देवस्थान ट्रस्टी पुजारी व ग्रामस्त यांनी बैठक घेऊन मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
निमगाव खंडोबा मंदिर दिनांक २६ ते २८ फेब्रुवारी पर्यत बंद राहाणार आहे. शनिवार दि २७ फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा याञा रद्द करण्यात आली आहे.मंदिर ३ दिवस बंद ठेवण्यात येनार आहे त्या दरम्यान खंडोबा मंदिराकडे येनारे सर्व रस्ते ३ दिवस बंद ठेवण्यात येनार आहे देवाचे मानापानाचे धार्मिक कार्यक्रम ,पालखी मिरवणूक सोहळा मोजक्या ग्रामस्तांच्या उपस्थित पार पडणार आहे.मंदिर बंद ठेवण्यात येनार असल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये अवाहन
जय मल्हार याञा व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष श्री बबनराव शिंदे ,उपअध्यक्ष श्री संतोष शिंदे ,सचिव बाबासाहेब शिंदे ,श्री बाळासाहेब (आबासाहेब )शिंदे ,श्री माऊली शिंदे ,श्री मनोहर गोरगल्ले शिवशंभू छावा प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य सचिव ,तसेच महाराष्ट्र राज्य पोलिस पाटिल संघटनेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे व ग्रामस्त यांनी केले आहे.

