यवतमाळ जिल्ह्यात 2 दिवसांची संपूर्ण संचारबंदी; अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

0 झुंजार झेप न्युज

जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवेची दुकाने फक्त सुरू राहणार आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आलेत.

यवतमाळ: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सदृश्य स्थिती जाहीर करण्यात आलीय. त्याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात 2 दिवसांची संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आलीय. शनिवार 27 फेब्रुवारी ते सोमवारी 1 मार्चच्या सकाळी 9 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवेची दुकाने फक्त सुरू राहणार आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आलेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली

गेल्या दहा दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे यवताळमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला होता. आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी 27 फेब्रुवारी ते सोमवारी 1 मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीय. यवतमाळमध्ये कोरोनामुळे डिसेंबर महिन्यात 29 , जानेवारी महिन्यात 25 मृत्यू झाले होते. तर फेब्रुवारी महिन्यात मृत्यू दरात मोठी वाढ झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या का वाढली?

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत जर पाहिलं तर कोरोनाच्या रुग्णाचा आलेख वाढत आहे, त्याचे कारणे म्हणजे सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, लग्न समारंभांमध्ये झालेली गर्दी, मास्क न वापरणे आधी नियम पायदळी तुडविल्याने हा आलेख वाढल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

अखेर अजित पवारांचा इशारा खरा ठरला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा मुंबईतल्या पत्रकार परिषदेत यवतमाळसह आणखी दोन जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल, असा इशारा दिला होता. शिवसेना आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संजय राठोड, यशोमती ताई, बच्चू कडू यांच्याशी मी बोललो आहे. कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर झाली तर तिथे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे मी त्यांच्या कानावर घातले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.