व्यापारी संघटना कडून भारत बंद चे आव्हाहन.कळंब शहरातून भारत बंदला मोठा प्रतिसाद....
कळंब ता. जि. उस्मानाबाद (रवींद्र ओव्हाळ उस्मानाबाद प्रतिनिधी) देशातल्या व्यापारी संघटनांनी आज देशव्यापी बंद पुकारला आहे.या संपला छोटे _ मोठे दुकानदार वाहतूक संघटना यांनी पाठिंबा दिला आहे या आव्हाहन ला कळंब शहरातील व्यापारी वर्गाने मोठा प्रतिसाद देऊन भारत बंद लां पाठिंबा दिला आहे.शहरात जवळपास 80% व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडले नाहीत.मेडिकल दवाखाने चालू आहेत.मेडिकल दवाखाने वगळता अन्य इतर दुकाने हे बंदच आहेत.तसेच याबरोबरच या बंद ला वाहतूक व्यवस्था ने देखील पाठिंबा दर्शवलेला आहे.शहरात दररोज ची होणारी लोकांची रहदारी देखील या बंद ला प्रतिसाद देत आज मोजक्या प्रमाणात दिसून येते आहे.
शहरातील छोटे_ मोठे दुकानदार वाहतूक व्यवस्था यांनी पाठिंबा दर्शवला यामुळे कळंब शहरात आज दिवसभर मार्केट आणि व्यवहार बंद राहण्याचे चिन्ह दिसत आहे.

