सौभाग्याचं लेणं यात्रेत चोरीला गेलं; 22 वर्षांनी मंगळसूत्र परत मिळालं

0 झुंजार झेप न्युज

 हे मंगळसूत्र पोलिसांच्या हाती लागल्यानंतरही शकुंतला यांना ते सहजासहजी हातात मिळाले नाही. त्यासाठी शकुंतला शिंदे यांना न्यायालयीन लढा द्यावा लागला.

उस्मानाबाद: आपण आतापर्यंत चित्रपटात किंवा कथा-कादंबऱ्यांमध्ये अनेक वर्षांपूर्वी हरवलेली माणसं, नातेवाईक एकमेकांना भेटल्याचं ऐकलं असेल. मात्र, उस्मानाबादमध्ये एका महिलेला 22 वर्षांपूर्वी हरवलेलं तिचं मंगळसूत्र (Chain snatching) परत मिळालं. अगदी चित्रपटात शोभेल अशीच ही संपूर्ण घटना आहे. या घटनेची सध्या राज्यभरात प्रचंड चर्चा सुरु आहे. 

शकुंतला शिंदे असे या भाग्यवान महिलेचे नाव आहे. हे मंगळसूत्र पोलिसांच्या हाती लागल्यानंतरही शकुंतला यांना ते सहजासहजी हातात मिळाले नाही. त्यासाठी शकुंतला शिंदे यांना न्यायालयीन लढा द्यावा लागला.

‘यात्रेच्या गर्दीत मंगळसूत्र गेले चोरीला’

उस्मानाबाद तालुक्यातील वाखरवाडी गावच्या शकुंतलाबाई शिंदे पती बरोबर उसतोड मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. 1998 साली त्या पतीबरोंबर येरमाळा येथील येडश्वरी यात्रेला गेल्या यात्रेच्या गर्दीत त्यांचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र चोरट्यांनी चोरले. मोलमजुरी करून मोठया कष्टाने कमावलेल सौभाग्याचं लेणं चोरीला गेल्याने त्या भर यात्रेत ढसाढसा रडल्या. पतीने समजुत घालुन शांत केले त्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली व गावाकडे निघुन गेले. तब्बल वर्षभराने पोलीसांनी मुद्देमालासह आरोपीला गजाआड केले. मात्र, त्यानंतर न्यायालयीन तारखा आणि सुनावण्यांमध्ये त्यांचे मंगळसूत्र अडकून पडले. तेव्हापासून शकुंतला शिंदे हे मंगळसूत्र परत मिळवण्यासाठी लढा देत होत्या.

अखेर 13 जुलै 2019 ला हे प्रकरण कोर्टात सुनावणीला आले. तेव्हा न्यायालयाने शकुंतला बाईंचे मंगळसूत्र परत देण्याचा आदेश पोलिसांना दिला. 2 मार्च 2021 रोजी पोलिसांनी हे सोने शकुंतला शिंदे यांना परत दिले. त्यामुळे यंदाचा महिलादिन शकुंतला शिंदे यांच्यासाठी खास ठरला आहे.

शकुंतला बाई चाळीशीच्या असताना मंगळसूत्र चोरीला, साठी गाठल्यानंतरही परत मिळाले

शकुंतला बाई चाळीस वर्षांच्या असताना त्यांचे मंगळसूत्र चोरीला गेले होते. आता त्यांनी वयाची साठी ओलांडली आहे. 22 वर्षांच्या या लढ्यात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या पतीची. आज हे सोने परत मिळाल्यामुळे पती-पत्नीच्या आनंदाला पारवराच उरला नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.