झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत येत असणाऱ्या प्रभाग क्रमांक १९ भाट नगर, बुद्ध नगर, अशोक नगर, पिंपरी येथील बिल्डिंग नंबर १ ते १७ मधील इमारतीचे तुटून पडत असणारे जिने व पावसाळ्यात गळणारे टेरेस ची दुरुस्ती करण्यासाठीचे बसपा चे निवेदन

0 झुंजार झेप न्युज

झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत येत असणाऱ्या प्रभाग क्रमांक १९ भाट नगर, बुद्ध नगर, अशोक नगर, पिंपरी येथील बिल्डिंग नंबर १ ते १७ मधील इमारतीचे तुटून पडत असणारे जिने व पावसाळ्यात गळणारे टेरेस ची दुरुस्ती करण्यासाठीचे बसपा चे निवेदन 

पिंपरी चिंचवड:झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत येत असणाऱ्या प्रभाग क्रमांक १९ भाट नगर, बुद्ध नगर, अशोक नगर, पिंपरी येथील बिल्डिंग नंबर १ ते १७ मधील इमारतीचे तुटून पडत असणारे जिने व पावसाळ्यात गळणारे टेरेस ची दुरुस्ती करण्यासाठीचे निवेदन बसपा पिंपरी चिंचवड शहर कमिटीच्या वतीने आज दिनांक ०३ मार्च २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहायक आयुक्त १, श्री. विकास ढाकणे यांना देण्यात आले व सदरील काम लवकरात लवकर करण्यात यावे यासंबधी चर्चा त्यांच्यासोबत करण्यात आली, यावेळी बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मा. सूरज गायकवाड, पिंपरी विधानसभा अध्यक्ष मा. चंद्रकांत सोनवणे, पिंपरी चिंचवड सचिव मा.राजेंद्र पवार, ज्येष्ठ बसपा नेते प्राध्यापक बी.बी. शिंदे, प्रभाग क्रमांक 19 भाटनगर, बुद्ध नगर, अशोक नगर चे स्थानिक रहिवाशी श्री बाबासाहेब अंकुरे, जयेश लोंढे, आदित्य जोगदंड श्रेयस दुशिंग रफेल खन्ना आदी बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व सदरील विषय लवकरात लवकर सोडवण्यात आले नाही तर बहुजन समाज पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.... 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.