लुधियाना डबल मर्डर केस, शेजारच्या अल्पवयीन मुलांचा खून करुन आरोपीची आत्महत्या

0 झुंजार झेप न्युज

 लुधियानामध्ये एका व्यक्तीने आपल्या शेजारच्या दोन अल्पवयीन मुलांची हत्या केली.

चंदीगड : लुधियानामध्ये एका व्यक्तीने आपल्या शेजारच्या दोन अल्पवयीन मुलांची हत्या केली. त्यानंतर शनिवारी लुधियानाच्या राजीव गांधी कॉलनीमध्ये एका भाड्याच्या खोलीत या व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाप, 22 वर्षीय शैलेन्द्र कुमार जो एका कारखान्यात मजूर म्हणून काम करत होता. त्याने शेजारच्या भाड्याच्या खोलीत जाऊन एका 6 आणि 8 वर्षाच्या चिमुकल्यांची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर त्याने गच्ची फिर छपरावरुन गळफास घेत आत्महत्या केली.

एसएचओ फोकल पॉईंट ठाण्याचे निरिक्षक दविंदर कुमार यांनी सांगितलं की, जेव्हा पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा शैलेंद्रचा मृत्यू झालेला होता. “मुलांची आई मागच्या खोलीत कपडे धूवत होती. मुलांनी आरडाओरड केल्याने ती आत आली. शैलेंद्र तिला त्रास द्यायचा. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांनी सांगितलं की दोन्ही मुलांचा गळा चिरण्यासाठी त्याने धारदार शस्त्राचा वापर केला.

मुलांचा आरडाओरड

मुलांचा आरडाओरड ऐकून स्थानिक लोकांनी तिथे गोंधळ घातला आणि दार तोडण्याचा प्रयत्न केला. जो आरोपीने आतून बंद केला होता. पण मोठ्या कालांतराने ते आत प्रवेश करण्यात यशस्वी झाले. स्थानिक लोकांनी पोलिसांना सूचना दिली आणि मुलांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिथे त्यांना मृत घोषित केलं.

महिला मीनू तिवारीचे पती शिव शंकर तिवारी यांच्यानुसार, आरोपीने शुक्रवारी सायंकाळी माझ्या पत्नीविरोधात असभ्य टिप्पणी केली. ज्यानंतर तिने त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. तिवारीने पोलिसांना सांगितलं की, शैलेंद्र त्याच्या पत्नीला त्रास द्यायचा आणि तीन महिन्याआधी त्यांनी शैलेंद्रला मारलं होतं.

एसएचओने सांगितलं की जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचली तेव्हापर्यंत आरोपीचा मृत्यू झाला होता. तिन्ही मृत्यूंमध्ये सीआरपीसीच्या कलम 174 अंतर्गत चौकशी करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.