मनसेची निवडणूक मोर्चेबांधणी, पुण्यात खांदेपालट; ‘या’ आक्रमक नेत्याकडे मोठी जबाबदारी

0 झुंजार झेप न्युज

 काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. 

पुणे: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) खांदेपालट करण्यात आला आहे. यामध्ये मनसेचे डॅशिंग आणि आक्रमक नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर विद्यमान शहर अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्यात मनसेकडून विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी राज ठाकरे यांच्याकडून पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आलेले वसंत मोरे हे आक्रमक नेतृत्त्वासाठी ओळखले जातात. त्यांनी कोरोनाच्या काळात अनेक कामे केली होती. याच कामगिरीमुळे वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपद सोपवण्यात आल्याचे समजते.

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने संताप, पुण्यात मनसे नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली

कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने वसंत मोरे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. रुग्णालयातून मृतदेह नेण्यासाठी पालिकेच्या वाहन आगाराजवळ रुग्णवाहिका मागवण्यात आली होती, परंतु वारंवार फोन करुनही रुग्णवाहिका येण्यास साडेतीन तासापेक्षा जास्त कालावधी लागला. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी अधिकाऱ्याच्या गाडीच्या काचा फोडल्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सक्रिय

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत कृष्णकुंजवर बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये राज ठाकरे विविध जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत आहेत. सोबतच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा जोमाने उतरेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.