विहामांडवा येथे शासनाच्या आदेशाचे पालन करीत भीम जयंती साजरी.
ता.पैठण विहामांडवा:(किशोर धायकर पैठण जि.औरंगाबाद प्रतिनिधी) : ज्ञानाचा महासागर, प्रखंड पंडित, स्त्रियांना समान अधिकार देणारे, माणसामाणसात भेद निर्माण करणाऱ्या मनुस्मृतीची होळी करून, कोट्यावधी अपयशांना हजारो वर्षाच्या गुलामीच्या खाईतून त्यांना वर काढणारे, व त्यांना माणुसकीच्या छायेत आणणारे, स्वातंत्र्य बंधुभाव ,समानता यावर आधारित भारतीय राज्यघटना लिहणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते, मात्र गेल्या वर्षीपासून शासनाने राज्यात लॉक डाउन व संचारबंदी लागू केल्यामुळे शासनाच्या आदेशाचे पालन करून मान्यवरांना मास्क वाटप करून, स्वच्छतेची जाणीव ठेवूनच जयंती साजरी केली होती, यावर्षी देखील कोरोनाच्या सावटखाली दरवर्षी सालाबाद प्रमाणे होणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती काही मोजक्याच समाज अनुयायांच्या उपस्थित मान्यवरांना मास्क वाटप करून स्वच्छतेविषयी जाणीव ठेवून विहामांडवा येथे तक्षशिला बौद्ध विहार गौतम नगर येथे पोलीस उपनिरीक्षक गोरक्षनाथ खरड, सरपंच नागेश आष्टीकर, मा.सरपंच अफसरभाई शेख, विलास पा. संत, यांनी डॉ. दिपप्रज्वलन करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले, यावेळी पोलीस उपनिरीक्षक गोरक्षनाथ खरड साहेब, राजेंद्र पन्हाळकर, अमरदीप डुकरे सर, सदाशिव ब्रह्मराक्षस सर, यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार नितीन ब्रह्मराक्षस, किशोर धायकरनंदू धायकर ज्ञानेश्वर ब्रह्मराक्षस परमेश्वर ब्रह्मराक्षस बळीराम ब्रह्मराक्षस योगेश ब्रह्मराक्षस नितीन शंकर धायकर प्रभाकर धायकर यांच्यासह संयोजक समितीने प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड राहुल धायकर,तर आभार प्रदर्शन सतीश धायकर यांनी केले.

