पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळा - २०२१ संपन्न
पुणे:आगामी पोलीस भरती प्रक्रिया व वाढती गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सम्यक विहार व विकास केंद्र बोपोडी पुणे येथे उपमहापौर मा.सौ.सुनिता परशुराम वाडेकर यांच्या विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी कार्यशाळेत सुमारे २५० होतकरु तरुण तरुणींनी सहभाग नोंदवला.
मार्गदर्शक म्हणून भंते नागघोषजी थेरो,प्रमुख उपस्थिती मा.परशुराम वाडेकर (रिपाई नेते) व,प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.सत्यम गाडे साहेब' (CID अधिकारी, महाराष्ट्र ) यांनी तरुणांना मार्गदर्शन केले.यावेळी पुण्याच्या उपमहापौर मा.सौ.सुनिता वाडेकर मा.परशुराम वाडेकर(अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी) मा.अविनाश कदम (अध्यक्ष शिवाजी नगर मतदार संघ)
मा.किरण सुरवसे मा.सुगंतसर आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

