सरकार कोरोनाला घाबरत नसून विरोधकांना घाबरतंय; चंद्रकांत पाटलांचा घणाघात

0 झुंजार झेप न्युज

कोरोनाच्या संकटामुळे राज्याचं विधीमंडळ अधिवेशन केवळ दोनच दिवसांचं घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

पालघर: कोरोनाच्या संकटामुळे राज्याचं विधीमंडळ अधिवेशन केवळ दोनच दिवसांचं घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही या निर्णयावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सरकार कोरोनाला घाबरत नसून विरोधकांना घाबरत आहे, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील आज पालघरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. दोन दिवसाच्या अधिवेशनाने काय होणार आहे. किमान महिनाभरासाठी तरी अधिवेशन घेतलं पाहिजे. तरच जनतेच्या समस्यांवर चर्चा होईल. कोरोनाचं निमित्त पुढे करून अधिवेशन केवळ दोनच दिवसांचं घेतलं जात आहे. ही सरकारची पळवाट आहे. हे सरकार कोरोनाला घाबरत नाही, तर विरोधी पक्षाला घाबरत आहे, अशी टीका पाटील यांनी केली.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.