दापोडी येथील कार्यशाळेची परिवहनमंत्री ॲड अनिल परब यांनी केली पहाणी

0 झुंजार झेप न्युज

दापोडी येथील कार्यशाळेची परिवहनमंत्री ॲड अनिल परब यांनी केली पहाणी

पुणे: राज्य परिवहन महामंडळाच्या दापोडी येथील कार्यशाळेची परिवहनमंत्री ॲड अनिल परब यांनी आज प्रत्यक्ष भेट देवून पहाणी केली. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, कार्यशाळा व्यवस्थापक श्री. खैरमोडे यांच्यासह कार्यशाळेतील सर्व संबंधीत अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत होते. रिवहनमंत्री ॲड परब यांनी बसनिर्मिती प्रक्रिया, त्यासाठी लागणारा कालावधी, उपलब्ध सोई-सुविधा, कर्मचारी यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत, त्यांच्या कार्यप्रणाली संबंधी माहिती घेतली. या प्रसंगी दापोडी कार्यशाळेतील विविध कर्मचारी संघटनांनी मा.परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांचे स्वागत केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.